योगासनेला खेळ म्हणून गावात रुजवण्याचे पाऊल आपण आजपासून का सुरू करू नये?

Townsol

June 16, 2025

 योग हा भारताचा प्राचीन वैभवशाली ठेवा आहे – शरीर, मन आणि आत्मा यांचे समतोल साधणारा एक मार्ग. आज ‘योगासने’ हा शब्द केवळ आरोग्यासाठी नव्हे तर आता भारत सरकारच्या AYUSH मंत्रालयाच्या पुढाकाराने स्पर्धात्मक खेळ म्हणूनही ओळखला जातो. 
 

आजवर योगाचा उपयोग केवळ आरोग्यासाठी होत असे, पण आता भारत सरकारने योगासनेला स्पर्धात्मक खेळ म्हणून मान्यता दिली आहे. आपला प्रत्येक गाव, शाळा, संस्था आणि समाज आता एका नवीन प्रवासाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 
 

प्रश्न एवढाच आहेसुरुवात कोण करणार? 
आपणच का नाही? आपणच का नाही पहिले गाव बनू जे योगासनास खेळ म्हणून स्वीकारेल आणि पुढे नेईल? 

चला, आपण सगळे मिळून योगासनेला गावातील घराघरात पोहोचवूया. मुलं, मुली, वयोवृद्ध, गृहिणी – सगळ्यांसाठी योगाचा प्रचार करूया. आणि हो – केवळ प्रचार नव्हे तर त्यात भाग घेणं, शाळांमध्ये वर्ग सुरु करणं, स्पर्धा घेणं – हे सुद्धा आपण करू शकतो. 

यासाठी आपण सगळे TownSol वर एकत्र येऊन चर्चा करूया 


District
Vision Partners