स्वावलंबी जिल्हा अभियान
Townsol
May 21, 2025
बुद्धिबळ राजा महाराजांचा खेळ याची सुरुवात भारतातच झाली चतुरंग या नावाने ६व्या शतकात! हा केवळ एक खेळ नसून मेंदूला धार देणारी एक कलाच आहे. आज जगभरात लाखो लोक या खेळाचे चाहते आहेत पण भारतातच काही विशिष्ट भागांपुरता याचा पगडा मर्यादित राहिला आहे.
आज भारताकडे जागतिक दर्जाचे ग्रँडमास्टर आहेत विश्वनाथ आनंद, प्रग्गनानंद, गुकेश, हरिकृष्णा, ज्यांनी भारताच्या नावाला chess विश्वात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. परंतु अजूनही हा खेळ अनेक ग्रामीण भागांमध्ये दुर्लक्षित राहतो.
अनेक शाळांमध्ये क्रिडा म्हणजे फक्त क्रिकेट, खो-खो, कबड्डी असे समजले जाते. बुद्धिबळाला अजूनही गंभीर खेळ म्हणून बघितले जाते. पण हे perception बदलण्याची गरज आहे. जर शाळांमध्ये हा खेळ extracurricular म्हणून शिकवला जात नसेल. तर आपल्याला कारणे समजून घ्यायला हवीत बुद्धिबळ शिक्षकांची कमतरता आहे का? बोर्डात खेळाचा समावेश नाही का? विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा उत्साह कमी आहे का?
हे कारणे ओळखून आपण त्या अनुषंगाने उपाययोजना करू शकतो.
बुद्धिबळ हे केवळ डोक्याचा खेळ नसून हा जीवनशैलीचा एक भाग होऊ शकतो आणि तो घडवण्याची सुरुवात आपल्या गावापासूनच करता येते!